कितीदा ?

कितीदा मी हसावे..?
कितीदा मी पडावे
कितीदा मी फसावे..?
हळवे मन हे
थकले रे
सोहळे बघण्या
चुकले रे
उठावे? पळावे ?
की बसावे रे..?
कितीदा मी फसावे..?
माझ्या मना मी
सांगावे..
हे त्याचेच तर
सांगावे?
न जावे ? बोलावे ?
की रुसावे रे..??
कितीदा मी फसावे..?
नको ते ओझे
अपेक्षांचे...
पोकळ , रिकामे
लक्ष्यांच्ये...
जोडावे? टिकावे ?
की नासावे रे?
कितीदा मी फसावे..?
संपली जरी वाट
संपलो न मी
हादरली ही धरणी
न कंपलो मी
रुजावे ...वाढावे ...
अन् कसावे रे..
जरी अनेकदा मी फसावे..
©नंदू चौधरी 16.5.25
No comments