नवीनतम

आदरणीय दिवे सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

लहानपणी कोणी आपल्याला पुस्तकांच्या जगात नेलं असेल, वाचनाची गोडी लावली असेल, तर ते नाव म्हणजे आदरणीय दिवे सर.  

जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा — जुन्या इमारतीतून लायब्ररीकडे जाणारा तो कॉरिडॉर, त्यातून चालताना मनात तयार होणारा वेगळाच आनंद... लायब्ररीमध्ये शिरल्यावर जाणवणारी ती निवांत शांतता... याचा अनुभव शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे.

आम्ही 1999 ते 2004 या काळात 6वी ते 10वी इथंच शिक्षण घेतलं. तेव्हा दिवे सरांनी आम्हाला लायब्ररी म्हणजे काय असते, पुस्तकाचे महत्त्व काय असते, त्याची शिस्त कशी पाळायची – हे सगळं मनापासून शिकवलं.  

चंपक, इंडिया टुडे आणि इतरही मासिकं वाचण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. त्या वयात ते मासिकं हातात येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची.

त्यांची ती खास सही अजूनही आठवते — जिच्यावर AHD ही अक्षरे एकमेकांत मिसळलेली असायची. 

आज असं वाटतं, त्या काळात डायरी लिहिण्याची सवय असती, तर ही सगळी आठवण अजून जास्त खोलवर जपता आली असती.  

पण जेवढं आठवतंय, तेवढं मनापासून पुन्हा जगतोय आज.

सर, आज आपण सेवानिवृत्त होत आहात. आपल्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो – ते आरोग्यदायी, आनंददायी आणि समाधानी जावो.

आपलाच एक विद्यार्थी  

**श्री नंदू भिमराव चौधरी**  

रोल नंबर: 1113  

सन: 1999 – 2004 



No comments