नवीनतम

मास्तर आणि प्रशासन

मास्तर ! आणि प्रशासन ? 

वृत्ती जरी बंडखोर

नसे मी कामचोर...

हुजऱ्यांच्या गर्दीत मी

एकटा पुरजोर...


कसा असतो राजा

कसे त्याचे प्रशासन

तोंड दाबून बुक्यांचा मार 

घातली आम्हा वेसण..

दिशाभूल करून राजाची

नाकर्ते शिरजोर...


फुल फुलण्याआधीच

कुचकरली जाते कळी

नाकातोंडाशी आल्यावर

दिला  जातो बळी...

एकतर्फी संप्रेषणाने

मारला जातो चकोर...


षंढ झालो आम्ही

केली त्यांनी किंमत 

प्रतिप्रश्न करण्याची

नसे कोणा हिंमत

का डरावे आता जरी

राजा असे समोर …


सिस्टम म्हणता अन् 

सगळीच अव्यवस्था...

वर्कलोड असेल म्हणून

मी सोडत नाही आस्था...

मास्तराला न्याय द्या

मग घ्या उपाधी थोर...


@नंदू चौधरी..

(On the prolonged two years journey of my DCPS contribution amount to NPS account)


No comments