आठवणीने दादा तुमच्या
आठवणीने दादा तुमच्या
डोळे भरून आले
कंठ दाटून आला दादा
का रुसून गेले ?
नातवाला दादा तुमच्या
अजून समज नाही
दादा परत येतील म्हणतो
गैरसमज काही
लगेच परत येतो म्हणुनी
का फसवून गेले ?
परत या हो दादा तुम्ही
का रुसून गेले ?
नातवाचे कोड कौतुक
कोण करेल दादा ?
जिंकूनसुद्धा खेळामध्ये
कोण हरेल दादा ?
रडवून परिवाराला
तुम्ही हसून गेले
परत या हो दादा तुम्ही
का रुसून गेले ?
म्हातारे बाबा म्हणतो
कधी दादा तुम्हाला म्हणतो
देवबाप्पा कधी इतका
कठोर कशास बनतो ?
सहवासाचे अल्प स्वप्न
अलगद पुसून गेले
परत या हो दादा तुम्ही
का रुसून गेले ?

No comments