नवीनतम

मतदार राजा

राजा नव्हताच कधी, आज खरंच रंक झाला
लोकशाहीच्या थट्टेचा,अजून एक अंक झाला

कोण खरे कोण खोटे
आपापसातले साटेलोटे
रांगेत हक्क बजावणारे
आम्ही नर्मदेचे गोटे
उरली सुरली ती ही गेली
आमच्यासाठी तुम्ही ,आता निरंक झाला
लोकशाहीच्या थट्टेचा,अजून एक अंक झाला

काय पाप काय पुण्य
बरबटलेले झाले धन्य
पर्याय नसे आता अन्य
मतदान व्हावे शून्य शून्य
निद्रिस्तांना उठवाया आज अखेरचा डंख झाला
लोकशाहीच्या थट्टेचा,अजून एक अंक झाला

© नंदू चौधरी


 

 

No comments