नवीनतम

आठवणी अंबासनच्या..

 भिला मामा वारले असे व्हाट्सअप्प वर समजताच , मनात आठवणींची गर्दी झाली. मन भूतकाळात गेले. आठवले ती जुनी टुमदार झोपडी. नंतर एकाच्या दोन उंच टुमदार झोपड्या झालेल्या. कष्टाने फुलवलेला मळा. आता जिथे दिमाखदार बंगला आहे त्यामागील पेरुचे जुने झाड. मामांच्या नकळत त्या झाडावर चढायचे आणि पेरू खायचे हा आमचा मळ्यात गेल्यावर ठरलेला कार्यक्रम. तसे भिला मामा मामांनी आम्हाला कधी हटकले नाही पण एक आदरयुक्त भीती कायम मनात असायची. 

आईला आणि मला मधमाशा चावल्या होत्या. त्या दिवशीचा प्रसंग आठवला. आईला तर खूप मधमाशा चावल्या पण मला आठवते त्यानुसार मामांच्याच झोपडीत मी पळत पळत मधमाशांपासून स्वतःची सुटका केलेली. 

असे अनेकानेक प्रसंग डोळ्यासमोरून येऊन गेले. आज आमची आजीमाय आवडाबोय , भिला मामा जुनी जाणती मंडळी आज आमच्यात नाहीत याचे दुःख आहे. त्यांचे कष्ट नेहमीच स्मरणात राहतील.

पुन्हा एकदा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली💐

- नंदू चौधरी(कल्याण)🙏🏻

No comments