नवीनतम

गुरू पौर्णिमा विशेष

गुरू -नवोदय विद्यालयातले


नुसतं पद म्हणाल तर
शिक्षक होते ,खरंतर
आम्हां दुरावलेल्या
बालकांचे पालक होते

देवरे सरांची माया म्हणजे
मरूस्थळातली छाया होती
कुणीही असो कसाही असो
ग्रहण करण्या पावक होते

पाटील सरांचा धाक म्हणजे 
प्रेमाचा परिपाक होता
घरचे कोणी नसल्यास
स्वतः अभिभावक होते 

वाबळे सरांचं गणित म्हणजे
कडक परी नवनीत होते
पार्थास कृष्ण जसे
सह्याद्री-रथाचे चालक होते

ओझा सरांचं हिंदी म्हणजे
शिकण्याची संधी होती
कोणत्याही विषयाच्या
ज्ञानाचे ते मालक होते

दिवे सरांचं ग्रंथालय म्हणजे
सरस्वतीचं आलय होतं
जिथले पुस्तक तिथेच
कडक संचालक होते..

नोट्स मीरा मधुराच्या त्या
सोनपारखे सरांच्या होत्या
हस्ताक्षर त्यांचे जणू
मोत्यांचे गोलक होते

मुकवाने सरांचं बाळा म्हणणं
मॅडमने मराठीचा लळा लावणं
दोघेही भाषेची होडी हळुवार
चालवणारे परिचालक होते
 किचकट गणिताला सोपं करणं
त्रिपाठी सरांचं हातातलं खेळणं
ऐन दहावीला सर भेटले
खरंच आमचे लक होते

गुप्ता सरांच्या नोट्स पुरेशा
लिख लो बस्स,नकोत चौकशा
शबनम बॅगेसोबत धावणारे
सायकल चालक होते

जाधव मॅडम आणि जाधव सर
कसा पडणार यांचा विसर ?
परकीय भाषा शिकण्यासाठी
आम्हांस प्रेरक होते

चौगुले सरांच्या पहाटेच्या भेटी
आठवते अजून ती कर्कश शिटी
साखर झोपेचे खोबरे पण
शरीर स्वास्थ्याचे तारक होते

सेलवंटे सरांचे गाणे सुरेल
कितीही ऐका कानी मुरेल
पेटी,पखवाज ,खंजिरी अन
सोबतीला ढोलक होते

तंडेल सरांची बेजोड चित्रकला
जोडीला आमच्या विजोड नकला
कार्यक्रम असला की,
सरांनी सजवलेले फलक होते

Continue...


7 comments:

  1. गुरू नवोदय विद्यालयातले कविता वाचून मन भरून आले... जुन्या आठवणी ताज्या केल्यात...धन्यवाद💐💐😊

    ReplyDelete
  2. It's true because they are not only our teachers they all our parents.
    Thank you teachers. Missing you alll.

    ReplyDelete
  3. Many of the names were familiar.I guess we were in different era but at the same location. It was like I lived that life once again in few seconds. Thanks bro for dusting off the layer of responsibility and giving time to oneself to relive the precious days. In the world of Brian Adams "Those were the best days of my life".Thanks a zillion..🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. Gurucha adar karnara guni student

    ReplyDelete