नवीनतम

क्षेत्र विठ्ठल

आषाढी वारी During Lockdown

क्षेत्र विठ्ठल

बाप माझा विठुराया
पोरांसी उभे कराया
आई माझी रखुमाई
पंढरी तिच्या पायी..


हसा-बोला बापासंगे
भक्त पुंडलिक सांगे
ते ही रडले हसले
पहिल्यांदा तू रांगे
आई बाप सांभाळी
पुंडलिक खरा होई..


आईबाप होते फक्त
जाळले जयांनी रक्त
होशील का ऋणमुक्त?
विचारी विठ्ठल भक्त
सांगे यंदाची आषाढी
विठू असे त्यांच्या ठायी...


आई बाप काढे पीक
तू जाऊन तरी विक
हीच तुझी वारी पोरा
सांगे भक्त पुंडलिक
मूल चाले योग्य वारी
बाप गाढ झोपी जाई...


 
 

No comments