शहर की गाव ?
शहर की गाव ?
शहर की गाव ?
गाव की शहर ?
मनी प्रश्न हे साचले होते ,पण
उत्तर काही सुचले नव्हते
कधी वाटतं शहरापेक्षा
गड्या आपला गाव बरा,
प्रेम जिव्हाळा दिसेल बघ
फक्त डोळे लाव जरा ,
संकटसमयी तर तेच
उभे ठाकले होते...
मनी प्रश्न हे साचले होते,पण
उत्तर काही सुचले नव्हते....
ही दुकाने , ही कारखाने
गावाकडं का नसावीत ?
प्रत्येकाला गाव हवा पण
पोटासाठी शहरं वसावीत ?
गावाकडं कामं नाहीत
शल्य आज बोचले होते,
मनी प्रश्न हे साचले होते,पण
उत्तर काही सुचले नव्हते ....
कधी कधी वाटतं गावापेक्षा
परवडते शहरातली वस्ती,
भाऊबंदकी ,कपट ,ईर्ष्या
असे विषारी डंख नसती,
दुःखं माझी बघून
आपलेच नाचले होते...
मनी प्रश्न हे साचले होते,पण
उत्तर काही सुचले
नव्हते ....
ती कुरणे ,ती माळराने
शहराकडं का नसावीत ?
श्रीमंतीने डोळे दिपले
पण स्वप्न का रुसावीत ?
वाटलं गावाची वाट धरावी, पण
चिखलात पाय खचले होते...
मनी प्रश्न हे साचले होते,पण
उत्तर काही सुचले नव्हते....
| what you will choose? |
No comments