नवीनतम

आज माझे नवोदय मला सोडून गेले..😔

 आदरणीय देवरे सरांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐

आता वाटते गुरु पौर्णिमेला फोन तरी करायला हवा होता. नुसते व्हॉट्सॲप नको..

परंतु सरांचा एवढा दांडगा परिवार असल्याने भरपूर फोन होत असतील त्यात आणखी माझी भर कशाला...म्हणून सरांशी व्हॉट्सॲप द्वारेच संवाद व्हायचा..

सरांना alumni meet च्या आधी कॉल केला होता .मी म्हटले retirememt पुढच्या पुढच्या वर्षी आहे तर या वर्षी आलेच पाहिजे का सर?

तेव्हा सर म्हटले होते की, "दरवर्षी आले पाहिजे....तसेही माझी retirement आणि alumni meet चा काय संबंध?मी आजारी होतो मागे.."माले दखाले तरी या रे!" 

त्या एका वाक्याने मी ठरवले की आपण गेले पाहिजे..सरांना भेटले पाहिजे..

आज माझ्या मनात एक समाधानही आहे..की जाण्याच्या आधी एकदा भेट तरी झाली..

आता नाही हिंमत होणार जाण्याची jnva ला...😔😭

२० वर्षांनी alumni meet ला सरांना भेटलो...अगदी दुरूनच नावानिशी हाक मारून जवळ बोलावून घेतले.. पाया पडताच सरांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि म्हटले "नका रे रडवू मला."

आता मी म्हणतो सर "का रडवून गेले आम्हाला."😔ही योग्य वेळ नव्हती सर...🙏🏻

ज्यांच्यामुळे नवोदय आम्हाला स्वर्ग वाटायचा त्या आमच्या गुरूंना.. भगवंता! स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव..

_अखेरचा प्रणाम सर.😔miss you

तुमचा 

_नंदू





No comments