नवीनतम

गर्व

गर्व 

राजस्थान मध्ये भिमपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात वैतरणा नावाची एक नदी वहायची. त्या गावातील लोक एकमेकांशी चांगले वागायचे. त्या गावातील नदी काठी दोन चांगले मित्र राहत होते. ते दोघेही दररोज सकाळी नदी काठी मासे पकडून बाजारात विकायला जायचे , त्या दोघांचा व्यापार चांगला चालायचा.

एके दिवशी ते दोघेही सकाळी पहाटे उठून मासे पकडायला गेले. त्या दिवशी त्यांना  मासे पकडतांना काही रंगीत मोती सापडले. त्यांना एकूण 20 मोती सापडले. त्या दोघांनी 10 मोती सरपंच दादांकडे दिले व 10 मोती सोनाऱ्याकडे दिले, सरपंच दादांना मोती दिल्याबदद्दल त्यांनी त्या दोघांना 2. एकर जमिन व 100 सोन्याची नाणी दिली. व सोनाऱ्याने ! त्यांना काही पैसे दिले. त्यांना एवढे पैसे व जमिन बघून त्यांच्या मनात गर्व भरला. त्यांनी एक कार विकत घेतली. एके दिवशी ते दोघेही फिरायला जाताना त्यांचा मित्र गणेश त्यांना भेटला, गणेश म्हणाला, "तुमच्या कारमध्ये  मी पण बसू का ? ते दोघेही  म्हणाले , " नाही तुझे पाय घाण झाले आहेत. तू आमच्या कारमध्ये बसू शकत नाही."     असे काही दिवस गेले. 

एके दिवशी गणेशने त्या दोघांच्याहून सुंदर कार घेतली. काही दिवसानंतर ते दोघेही फिरायला जाताना त्यांचा मित्र गणेश त्यांना दिसला. गणेशची कार त्यांच्याहून सुंदर असल्यामुळे ते  दोघेही त्याच्या जवळ गेले व म्हणाले, "आम्ही पण तुझ्या गाडीत बसू शकतो का ?" गणेश म्हणाला , " नाही! तूमचे पाय घाण झाले आहेत." ते दोघेही म्हणाले, "आम्ही पाय धूवून येतो." गणेश म्हणाला, "चालेल." ते दोघेही पाय धुवायला गेले आणि गणेशने लगेच कार पुढे नेली. काही वेळानंतर ते दोघेही पाय धुवून आले. आणि बघितले तर काय ?  गणेश तेथे नव्हता .  त्यांनी गणेशची काही वेळ वाट बघितली. काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की ,त्यांनी गणेश सोबत केलेला  भेदभाव त्याच्या लक्षात आला असेल."

म्हणून मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. 

मनस्वी दिनकर माळी 

इयत्ता ६ वी


 

1 comment:

  1. छान मनस्वी . खूप छान गोष्ट लिहिली आहे. Keep writing.

    ReplyDelete