नवीनतम

पहिला पाऊस

पहिला पाऊस                                                       

माती म्हणते मेघाशी,

किती रे तू दुष्ट..

भेटायचंच आहे तर,

सांग ना तसं स्पष्ट...

 

घामाने पार भिजली मी

कशा उगाला तापवतोस

वाट बघून थकली तर

वादळ वारे पाठवतोस

सांगावे भेटीचे पण

देखाव्याला गोष्ट..

भेटायचंच आहे तर,

सांग ना तसं स्पष्ट...१

 

हुंदका दाटून आलाय

तरी स्वतःला सावरतोस

भेट आपली निश्चित

तरी कुणाला घाबरतोस ?

आढेवेढे घेण्याइतपत

कसले त्यात कष्ट ?

भेटायचंच आहे तर,

सांग ना तसं स्पष्ट...२

 

पड एकदाचा ..

आणि घे गळाभेट

विरह तो वर्षांचा

पण घटकेचा समेट

तुलाच यावं लागेल

भले तू श्रेष्ठ मी कनिष्ठ ..

भेटायचंच आहे तर,

सांग ना तसं स्पष्ट...३

माती म्हणते मेघाशी,

किती रे तू दुष्ट ? ”

भेटायचंच आहे तर,

सांग ना तसं स्पष्ट ...

      ©नंदू चौधरी

 Yoga Music for a Rainy Day - Spirit Voyage Blog

No comments